
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी बांगलादेशच्या माजी निवडणूक आयुक्तांना अटक करण्यात आल्याचा जुना फोटो आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. बांगलादेशात निवडणूक आयुक्तांसोबत जे घडलं तेच एक दिवस हिंदुस्थानात घडेल, असा इशारा प्रशांत भूषण यांनी दिला. त्यांचा रोख सध्याचे वादग्रस्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे होता.
This Will also happen in India one day pic.twitter.com/IPG1jxIH0a
— Prashant Bhushan (@pbhushan1) November 18, 2025
बांगलादेशचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त नुरुल हुदा यांना 22 जून रोजी बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. अटक करण्यापूर्वी जमावाने त्यांना बेदम मारहाणही केली होती. जमावाने त्यांच्या ढाका येथील घरावर हल्लाही केला होता. निवडणुकीमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अशाच हेराफेरीचा आरोप हिंदुस्थानातही होत आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजप मतचोरी करत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशांत भूषण यांनी एक्सवर पोस्ट करत इशारा दिला आहे.
SIR प्रक्रिया जबरदस्तीनं राबवणं धोकादायक, ममतांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना सुनावलं
दरम्यान, अशाच प्रकारचे एक ट्विट तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही केले. बांगलादेशच्या माजी निवडणूक आयुक्तांना अटक केलेल्या बातमीचा फोटो त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर करत ‘येथेही हे घडणार आहे’, असे म्हटले.





























































