प्रशांत दामले देणार ‘मत्त’ बातमी

अभिनेते प्रशांत दामले सोशल मीडियावर खूप ऑक्टिव्ह असतात. आताही एका पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांनी लिहिलेल्या पोस्टची जोरदार चर्चा आहे. लवकरच एक आनंदाची बातमी देणार, असं दामले यांनी म्हटले आहे. नेमकी ही बातमी काय असणार, याचा अंदाज चाहते बांधत आहेत.

प्रशांत दामले यांनी लिहिलंय, ’लवकरच एक मत्त आनंदाची बातमी देणार आहे’. पोस्टमधील ’मत्त’ या शब्दाने सगळ्यांचे लक्ष वेधलंय. लहान मुलांच्या बोबड्या बोलासारखा शब्द त्यांनी वापरलाय. तो वाचून पोस्टवर कमेंटचा पाऊस पडत आहे. नक्कीच बातमी ’मत्त’ असणार, असे सगळे म्हणत आहेत. नाटकाच्या प्रयोगविषयी काही असेल, असा अंदाजही व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या