
बिहारमधील बांकिपूर पोटनिवडणूकीत प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा 18,953 मतांनी पराभव केला आहे. किशोर यांच्या विजयाने गेली 30 वर्ष सत्ता असलेल्या भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला.
बिहारमधील बांकीपूर विधानसभा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. नितीन नवीन यांनी सलग पाच वेळा विधानसभा जिंकली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर नितीन नबीन हे राज्यसभेवर गेले. त्यामुळे बांकीपूरची सीट रिकामी झाली होती. या मतदारसंघात 30 जुलै रोजी मतदान पार पडले. या पोटनिवडणूकीचा 3 ऑगस्ट रोजी निकाल लागला. तत्यात जन सुराज पार्टीचे प्रशांत किशोर यांनी राजदच्या रेखा गुप्ता आणि एनडीए-समर्थित भाजप उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा पराभव केला.


























































