नितीश कुमार खोटारडे, प्रशांत किशोर यांनी फटकारले

993

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व जदयूचे नेते प्रशांत किशोर यांच्यात विस्तव जात नाही. प्रशांत किशोर यांनी मंगळवारी नितीश कुमार यांना फटकारत त्यांचा खोटारडे असा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता यांच्यातील वाद वाढत जाणार असून प्रशांत किशोर पक्षाला राम राम ठोकतील अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.

मंगळवारी प्रशांत किशोर यांच्या बाबत नितीश कुमार यांना एका कार्यक्रमात विचारले असता त्यांनी देखील नाव न घेता अप्रत्यक्षरित्या त्यांना टोले हाणले आहेत. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून प्रशांत किशोर यांना पक्षात घेतल्याचा दावा देखील केला. त्यांचा हा दावा खोटा असल्याचे प्रशांत किशोर यांचे म्हणने आहे. किशोर यांनी ट्विटरवरून नितीश कुमार यांना फटकारले आहे.

‘मी जदयूत कसा प्रवेश केला याबाबत नितीश कुमार यांनी खोटे सांगितले आहे. ते ज्या रंगात रंगले आहेत त्याच रंगात मलाही रंगवायचा हा खूपच वाईट प्रयत्न होता. जर तुम्ही खरंच सांगत असाल तर कोण यावर विश्वास ठेवेल की अमित शहा यांनी सुचवलेल्या व्यक्तीचे तुम्ही ऐकत नाही’, असे ट्विट प्रशांत किशोर यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या