मी बोललो तर लालूंना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, प्रशांत किशोरचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prashant-kishore

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार महाआघाडीतून बाहेर पडल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांना महाआघाडीत पुन्हा सहभागी व्हायचे होते मात्र, त्यासाठी त्यांनी प्रशांत किशोर यांना अनेकदा माझ्याकडे पाठवले असा दावा लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या पुस्तकातून केला आहे. त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सांगत प्रशांत किशोर यांनी लालूंवरच निशाणा साधला आहे. मी जर तोंड उघडले तर लालूंना तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही, असा इशारा प्रशांत किशोर यांनी लालूंना दिला आहे.

लालूप्रसाद यादव यांचे ‘गोपालगंज टू रायसीना : माय पॉलिटिकल जर्नी’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात त्यांनी नितीश कुमारांबाबतचा हा दावा करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत किशोर यांनी ट्विटरवरून लालूंना इशारा दिला असून त्यांनी केलेला दावा बोगस असल्याचे म्हटले आहे. ‘लालूंजींचा दावा हा बोगस आहे. हा फक्त चर्चेत राहण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे. मी जदयूत प्रवेश करायच्या आदी बऱ्याचदा त्यांची भेट घेतली मात्र जर आम्ही त्यावेळी काय चर्चा केली हे जर मी सांगितले तर लालूजींना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा किशोर यांनी ट्विटरवरून दिला आहे.