ज्यांना वंदे मातरम् नको त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही – प्रतापचंद्र सारंगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यांना वंदे मातरम् म्हणायचे नाही त्यांना या देशात राहण्याचा अधिकारच नाही, असे केंद्रीय मंत्री प्रतापचंद्र सारंगी यांनी म्हटले आहे.  विरोधक सीएए आंदोलन करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही सारंगी यांनी केला. कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतरही सारंगी यांनी विरोधक यावरून जनतेत गैरसमज पसरवत असल्याचा आरोप केला होता.

सीएए आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेने आभार मानायला हवेत असेही सारंगी म्हणाले. सीएए म्हणजे काँग्रेसने केलेल्या पापांचे प्रायश्चित्त आहे. काँग्रेसने जनतेत फूट पाडली. त्याचे प्रायश्चित्त करण्याचे हे एक माध्यम असल्याची टीकाही सारंगी यांनी केली. सीएए 70 वर्षांपूर्वीच आणायला हवे होते. काँग्रेसने पाप केले आणि आम्ही त्याचे प्रायश्चित्त भोगत आहोत, अशी टीका सारंगी यांनी केली.