प्रथमेश परब चढणार बोहल्यावर?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. ’आमचं ठरलं आहे, लग्नाला यायचं हं… पत्रिका गुरुवारी पाठवतोय.’ असे म्हणत बोहल्यावर चढण्यास सज्ज झालेल्या प्रथमेशच्या या सोशल मीडियावरील पोस्टच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

प्रथमेश खऱया आयुष्यात नव्हे तर मोठय़ा पडद्यावरील आयुष्यात बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. विनोद आणि प्रेम याचे उत्तम समीकरण साधत प्रथमेश परब भिनित ’ढिशक्यांव’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.