लैंगिक अत्याचार प्रकरणी चौघांना अटकपूर्व जामीन

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. या कुटुंबीयांनी पीडित मुलाला पोर्नोग्राफिक व्हिडीओ पाहण्यास भाग पाडले आणि त्याला अयोग्यरीत्या स्पर्श केल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी चारही अर्जदारांना प्रत्येकी 25 हजारांच्या जाचमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच अधिक तपासासाठी आवश्यकता असेल त्यावेळी तपास अधिकायांपुढे हजर राहण्याचे निर्देश दिले.

मुंबईच्या उपनगरात नोव्हेंबर 2020 मध्ये कथित लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, पीडित अल्पवयीन मुलगा आरोपींच्या घरी गेला होता. त्यावेळी त्यांच्या घरातील 80 वर्षीय वृद्ध व इतर तिघांनी मुलाला पोर्नोग्राफिक व्हिडीओ पाहण्यास भाग पडले. तसेच मुलाला अयोग्य पद्धतीने स्पर्श करून त्याचा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.