वारणानगर येथील कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (सोमवार, दि. 2) प्रथमच कोल्हापूर जिल्हा दौऱयावर येत आहेत. राष्ट्रपती करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार असल्याने त्यांच्या सुरक्षेचा भाग म्हणून सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत भाविकांसाठी चार तास देवीचे दर्शन बंद राहणार आहे.
सुरक्षिततेच्या कारणास्तव दर्शनाची गैरसोय होऊ नये, यासाठी दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतचा कालावधी वगळून भाविकांनी इतरवेळी देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात आले आहे.