पुन्हा हल्ला केल्यास जोरदार प्रत्युत्तर देऊ, ट्रम्प यांचा इराणला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इराणला इशारा दिला आहे. पुन्हा हल्ला करण्याची चूक इराणने करू नये अन्यथा त्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल असे ट्रम्प म्हणाले आहेत.

ट्रम्प यांनी ट्वीट करून इराणला इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “त्यांनी आमच्यावर हल्ला केला त्याचे प्रत्युत्तरादाखल आम्ही उत्तर दिले आहे. जर ते पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत असतील तर त्यांनी मी सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी असे करू नये. अन्यथा आम्ही असा हल्ला करू की त्याचे परिणाम खूप वाईट होतील.

तसेच अमेरिकेचे सैन्याच्या उपकरणावर फक्त दोन ट्रिलियन डॉलर खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही जगातील सर्वात मोठा देश आहोत आणि आतापर्यंत सर्वात चांगले देश म्हणून होतो. जर आता इराणने आता आता अमेरिकेच्या एकही तळावर किंव अमेरिकन नागरिकावर हल्ला केला तर त्यांच्यावर एखाद्या सुंदर हत्यारे वापरू आणि ती वापरताना आम्ही कुठलाही मुलाहिजा बाळगणार नाही असे ट्रम्प म्हणाले.