
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जर्मनीला जाणार आहेत. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्या निमंत्रणावरून ते 26-27 जून रोजी शोल्स एल्माऊ येथे भेट देणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. जर्मनीच्या अध्यक्षतेखाली जी-7 शिखर परिषद होणार असून त्यात अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल, दक्षिण आफ्रिका या देशांनाही आमंत्रित केले आहे.




























































