खून प्रकरणातील पॅरोलवरील कैदी फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली हरंगुळ येथील कैदी कोरोनाच्या कालावधीत पॅरोलवर बाहेर आलेला होता. परंतु तो फरार झाला असून त्याच्याविरुध्द येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण भिमराव मुंढे पोलीस हवालदार मध्यवर्ती कारागृह हर्सुल संभाजीनगर यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, लातूर तालूक्यातील मौजे हरंगुळे येथील रोहित बालाजी वाघमारे यास सत्र न्यायालय लातूर यांनी खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली होती. तसेच 2 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने शिक्षा ठोठावलेली होती. कोरोनाच्या कारणात कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलेले होते. 12 मार्च 2021 रोजी राहूल बालाजी वाघमारे हा पॅरोलवर आला परंतु तो नंतर कारागृहात परत आला नाही. 2 जून 2022 रोजी तो कारागृहात परतणे आवश्यक होते. परंतु तो फरार झाल्यामुळे त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.