पृथ्वी, अय्यर, अंकित भिडणार विंडीजला, बोर्ड अध्यक्षीय इलेव्हन संघात निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

वेस्ट इंडीजचा क्रिकेट संघ हिंदुस्थान दौऱ्यावर येत असून त्याआधी 29 सप्टेंबरपासून बडोदे येथे दोनदिवसीय सराव सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सराव सामन्यासाठी बोर्ड अध्यक्षीय संघाची निवड अखिल हिंदुस्थानी सीनियर निवड समितीने शुक्रवारी केली. यामध्ये पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर व अंकित बावणे या महाराष्ट्राच्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

पहिल्या कसोटीत त्रिशतक झळकावणारा करुण नायर याच्याकडे नेतृत्वपद सोपवण्यात आले आहे. तसेच मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, इशान किशन, बासील थम्पी, आवेश खान यांनाही या संघात प्रवेश देण्यात आला आहे.

बोर्ड अध्यक्षीय इलेव्हन संघ
मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, करुण नायर (कर्णधार), श्रेयस अय्यर, अंकित बावणे, इशान किशन (यष्टिरक्षक), जलाज सक्सेना, सौरभकुमार, बासील थम्पी, आवेश खान, के. विघ्नेश, इशान पोरेल.

युवा संघाचीही घोषणा
ढाका येथे 29 सप्टेंबरपासून एसीसी 19 वर्षांखालील आशिया कप खेळवण्यात येणार असून या स्पर्धेसाठीही हिंदुस्थानी संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी पवन शहाकडे नेतृत्व सोपवण्यात आले असून यतीन मांगवानीऐवजी सबीर खानची निवड करण्यात आली आहे.

आशिया कपसाठी हिंदुस्थानचा 19 वर्षांखालील संघ
पवन शहा (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, यशस्वी जैसवाल, अनुज रावत (यष्टिरक्षक), यश राठोड, अयुष बदोनी, निहाल वाधेरा, प्राब सिमरन सिंग (यष्टिरक्षक), सिद्धार्थ देसाई, हर्ष त्यागी, अजय देव गौड, मोहित जांगडा, समीर चौधरी, राजेश मोहांती, सबीर खान.

summary- prithvi shaw shreyas iyer got selected for board team