डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींचंही अपहरण करतील का? वाचा काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण

अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करून त्यांचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी मादुरो व त्यांच्या पत्नीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. या घडामोडींवर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. व्हेनेझुएलावर अमेरिकेने जशी कारवाई केली तशी कारवाई हिंदुस्थानात देखील होईल का? डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींचंही अपहरण करतील का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

व्हेनेझुएलावर अमेरिकेने जशी कारवाई केली तशी कारवाई हिंदुस्थानात देखील होईल का? डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अपहरण करतील का? आता तेवढंच बाकी राहिलं आहे असं मला वाटतं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. अमेरिकेने हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लावले आहे. एवढ्या टॅरिफसह व्यापार करणं अशक्य आहे. अमेरिकेत आपल्याकडून निर्यात होणाऱ्या गोष्टी यावर मर्यादा यावी म्हणून टॅरिफ लादलं गेलं आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले .