प्रायव्हेट ट्रेनसाठी 23 कंपन्यांनी दाखविला रस

263

देशातील पीपीपी मॉडेलवर रेल्वे गाडय़ांचे खासगीकरण करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दिल्ली येथे झालेल्या निविदापूर्व बैठकीत बुधवारी 23 कंपन्यांनी सहभाग घेत आपला रस दाखविला आहे. विशेष म्हणजे त्यात परदेशी अल्स्टॉम, बम्बार्डिअरपासून ते मेधा इंजिनिअरिंग, आयआरसीटीसीसारख्या देशी कंपन्यांनी या गाडय़ा चालविण्यात रस दाखविला आहे. रेल्वेने 109 मार्गांवर 151 अत्याधुनिक ट्रेन चालविण्यासाठी ‘आरएफक्यू’ निविदा मागविल्या आहेत. या ट्रेनचे ड्रायव्हर आणि गार्ड तेवढे रेल्वेचे असणार असून वित्तपुरवठा, खरेदी, ऑपरेशन्स आणि देखभाल आदी सर्व अधिकार प्रायव्हेट कंपन्यांना दिलेले असणार आहेत. 16 डब्यांच्या असणार असून त्यांचा वेग दरताशी 160 कि.मी. इतका असणार आहे. याप्रकल्पातरेल्वेला एकूण 30 हजार कोटीच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या