खाजगी वाहन चालकाची एसटी चालकाला मारहाण; एसटी चालकांनी व्यक्त केला संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद नायगावकर

चारचाकी वाहनचालकाने एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना यवतमाळमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेबाबत एसटी चालकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची तक्रार अवधूतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. एका वाहनचालकाने एसटी चालकाना स्टेअरिंगवरून खाली ओढले आणि पट्ट्याने मारहाण केली आहे. हा घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ज्ञानेश्वर जाधव असे मारहाण झालेल्या एसटी चालकाचे नाव आहे. घाटंजी येथून यवतमाळकडे येत असताना नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय मागमार्गावरील बायपास रस्त्यावर भरधाव येणारे खाजगी वाहन एसटीला धडकणार होते. त्यामुळे संतापलेल्या वाहनचालकाने रागाच्या भरात एसटी चालक ज्ञानेश्वर जाधव यांना स्टेअरिंगवरून खाली ओढत माराहण केली. वाहन चालकाकडून सुटका करून घेत जाधव यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठले आणि आपली तक्रार नोंदविली. या प्रकारामुळे एसटी चालक संतप्त झाले आहेत. अशा प्रकारच्या घटनांना ओळा बसावा, यासाठी दोषी वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.