कपड्यांवरुन सुसंस्कृतपणा ठरत नाही… प्रिया बापटचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी अभिनेत्री प्रिया बापट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रिया बापटने गेल्या महिन्यात बिकिनीतले फोटो शेअर केले होते. त्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र त्यावेळी तिने ट्रोलर्सना उत्तर देणं टाळलं आणि मौन राखणं पसंत केलं होतं. पण प्रियाने नुकत्याच एका मुलाखतीत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रिया बापट म्हणते की, ”गेल्या महिन्यात मी ऑस्ट्रेलियाला गेले होते. त्यावेळी मी बिकिनीतील फोटो शेअर केले होते. फोटो शेअर केल्यानंतर काहींनी कौतूक केले पण काहींनी प्रचंड ट्रोल केले. काहीं चाहत्यांना बिकनी घालून फोटो शेअर केल्याने माझ्या धाडसाचे कौतुक केले”. पुढे ती म्हणते, ”आपण खूप सोयीस्कररित्या मराठी संस्कृतीचे झेंडे घेऊन फिरतो. मला ही गोष्ट खटकते. मी कोणते कपडे घालावेत यावरुन आपली संस्कृती ठरत नाही. माझे संस्कार, आचार-विचार, वागणं-बोलणं, प्रामाणिकपणा यावर माझा सुसंस्कृतपणा ठरतो. तो माझ्या कपड्यांवरुन ठरत नाही. ज्यांना मी साडीत सुसंस्कृत आणि बिकिनीत वाईट दिसते अशा लोकांना उत्तर द्यावेसे वाटते की, मुळात एखाद्या व्यक्तीला चांगले किंवा वाईट ठरवण्यासाठी कपडे हा क्रायटेरिया असूच शकत नाही. काहिंच्या मते माझ्याकडे काम नाही म्हणून अशाप्रकारचे फोटो शेअर केल्यावर काम मिळेल असं वाटतं” पण या इंडस्ट्रीत असे होत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

”मला बिकिनी घालायला आवडते. प्रत्येकाचा एक बॉडी टाईप असतो. मी बिकिनीत काढलेले फोटो मला आवडले आणि मला आवडले म्हणूनच ते शेअर केले. सर्वांना ते फोटो आवडावे असे काहीच नाही. जोपर्यंत माझ्या घरच्यांना ती गोष्ट चूकीची वाटत नाही तोपर्यंत काही फरक पडत नाही. पण प्रत्येक कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या आवडीनिवडी असू शकतात हे लोकांनी मान्य करायला हवं असंही पुढे ती म्हणाली”.