महामारीचे गांभीर्य समजून घ्या, कृपया घरात रहा! प्रियांका चोप्राची चाहत्यांना कळकळीची विनंती

बॉलीवूडसह हॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये राहत असली तरी हिंदुस्थानातील कोरोनाची परिस्थिती पाहून तिने चिंता व्यक्त केली आहे. ‘महामारीचे गांभीर्य समजून घ्या, कृपया घरात रहा’, अशी कळकळीची विनंती तिने नागरिकांना केली आहे. प्रियांकाने इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलंय, ‘देशात कोरोनाची गंभीर स्थिती आहे. कृपा करून घराबाहेर पडू नका.

स्वतःचा परिवार, मित्रमंडळी आणि शेजारच्यांसाठीही हे गरजेचे आहे. प्रत्येक कोरोना वॉरियर्स, फ्रंटलाइन वर्कर्स हेच सांगतायत. घराबाहेर पडावे लागलेच तर मास्क घाला. महामारीचे गांभीर्य समजून घ्या, लस घ्या. यामुळे वैद्यकीय यंत्रणेचा ताण कमी होईल.’

आपली प्रतिक्रिया द्या