
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा जोनस ही सध्या हॉलिवूडमध्ये तिचा डंका वाजत आहे. बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवल्यानंतर आता प्रियंका लग्न झाल्यानंतर हॉलिवूडमध्ये स्थिरावली आहे. प्रियंकाच्या या यशाचा साऱ्या देशाला अभिमान वाटतो. मात्र सध्या तिचा एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात ती हिंदुस्थानी सिनेमाबद्दल विचित्र वक्तव्य करताना दिसत आहे.
प्रियंकाचा हा व्हिडीओ 2016 च्या एमी पुरस्कार सोहळ्यातला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यात प्रियंकाला सूत्रसंचालक हिंदुस्थानी सिनेमाबद्दल विचारते. त्यावर प्रियंका डान्स करत सांगते की हिंदुस्थानी सिनेमाचा पूर्ण फोकस हा हिप्स आणि बूब्सवर असतो. तिचे हे वक्तव्य व्हायरल होत असून त्यावरून नेटकऱ्यांनी तिला फटकारले आहे.
प्रियंकाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच खडसावले आहे. ”2-4 हॉलिवूड सिनेमा काय केले, तु कोन होतीस ते विसरून गेलीस का? असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे. ‘हो हा तोच हिंदुस्थानी सिनेमा आहे जिथे तु काम करत होतीस’, असे सुनावले आहे.

























































