प्रियंका चोप्राने लंडनमध्ये तोडले लॉकडाऊनचे नियम, पोलिसांनी दिली तंबी

ब्रिटनमध्ये कोरोनाचा घातक स्ट्रेन मिळाल्याने लागू केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे अभिनेत्री प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनस हे लंडनमध्ये अडकले आहेत. लंडनमध्ये कुणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नसताना प्रियंका चोप्रा चक्क सर्व नियम तोडून सलोनमध्ये गेली होती. मात्र याबाबत काहींनी तक्रार केल्यानंतर तत्काळ पोलीस त्या सलोनमध्ये पोहोचले व त्यांनी सर्वांना तंबी देत परत पाठवले.

प्रियंका व तिची आई मधू चोप्रा सोबत सेलिब्रिटी स्टायलिस्ट जोश वूड याच्या सलोमनमध्ये गेली होती. जोश वूडने प्रियंकाच्या विनंतीनंतर सलोन खोलले होते. मात्र त्यानंतर काही वेळातच तिथे पोलीस धडकले. त्यांनी प्रियंका व सलोन मालकाला लॉकडाऊन न तोडण्याची तंबी दिली. सुदैवाने त्यांना दंड भरावा लागला नाही.

प्रियंका व निक हे त्यांचा आगामी चित्रपट ‘टेक्स्ट फॉर यू’ चित्रपटाच्या शूटिंग साठी लंडनमध्ये आले होते. मात्र ब्रिटनमध्ये मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केल्यानंतर प्रियंका व निक अडकले आहेत. चित्रपटाची टीम त्यांच्या क्रूला अमेरिकेत परत पाठविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या