
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बॉलीवूडची देसीगर्ल प्रियांका चोप्राकडे ‘गुड न्यूज’ असल्याची चर्चा जोरदार सुरू होती. सोशल मीडियावर फिरणाऱ्या तिच्या फोटोसोबत ‘बेबी बंप’ दिसत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र यावर प्रियांका काहीच बोलण्यास तयार नाही. अखेर तिची आई मधु चोप्रा यांनी या मेसेजनंतर मीडिला माहिती दिली.
1 डिसेंबर 2018 रोजी प्रियांकाचं निक जोन्स सोबत लग्न झालं आणि दोन महिन्यांनंतर लगेच प्रियांकाच्या संदर्भात ‘गुड न्यूज’चा मेसेज आणि फोटो व्हायरल झाला. अनेकांनी आपापल्या पद्धतीने त्यावर चर्चा केली आणि कयास लावले. मात्र प्रियांकाच्या आईने आता मौन सोडलं असून फोटो ज्या अँगलने काढला त्यात चूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी प्रियांकासोबत या विषयावर बोलले. सध्या तिच्या फिल्मचं प्रमोशन सुरू असल्याने ती थकली होती. लोक काय बोलताहेत असं विचारल्यावर याविषयावर मला ब्रेक पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

याआधी फिल्म प्रमोशनच्यावेळी प्रियांकाला फॅमिली प्लानिंगबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर ती म्हणाली की, मी खूप खूश आहे. माझे कुटुंबीय आनंदात आहेत आणि फायनली माझं लग्न झालं आहे. फॅमिली प्लांनिंगसंदर्भात नक्कीच आम्ही बोलू. आमची देखील तशी इच्छा आहे. ते जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, असं ती म्हणाली होती.




























































