
बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर पाहून चक्क सासऱ्यांनी तिच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच सून म्हणून तिचा अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी व्यक्त केले आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. तिचा नुकताच द व्हाईट टायगर सिनेमाचा ट्रेलर प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर शेअर केला.
ट्रेलर पाहून तिच्या अभिनयाचे सगळ्यांनीच कौतुक केले आहे. पण यामध्ये इन्स्टाग्रामची एक प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली ती म्हणजे निक जॉनचे वडिल आणि प्रियांकाचे सासरे पॉल केवीन यांची. तिचा अभिनय पाहून चक्क तिचे सासरे भारावले आहेत. त्यांनी ट्रेलर पाहून चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे. तुझा आम्हांला अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार अरविंद अडिगा यांच्या द व्हाईट टायगर कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा, राजकुमार राव आणि आदर्श गौरव मुख्य भूमिकेत आहे. तर आदर्श गौरव यांचा पहिलाच सिनेमा आहे. द व्हाईट टायगर कादंबरीने 2008 चा मॅन बुकर पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे चित्रपट लोकांना किती आवडतोय ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.






























































