
सामना ऑनलाईन । उत्तर प्रदेश
तुम्ही 56 इंचांची छाती असल्याचे ठणकावून सांगता पण मग तुमचे हृदय कुठे आहे, असा टोला काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींना लगावला. उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी मोदी उद्धटपणे वागत असल्याची टीका केली.
पंतप्रधान राष्ट्रवादावर बोलताना फक्त पाकिस्तानचा उल्लेख करतात. त्यांच्यासाठी राष्ट्रवाद म्हणजे पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईकर सतत बोलत राहणे, रोजगार आणि शेतकऱ्यांचे मुद्दे त्यांच्यासाठी राष्ट्रवाद नाही अशी टीका करत 56 इंचांची छाती आहे, पण मग तुमचे हृदय कुठे, असा सवाल प्रियंका गांधी यांनी मोदींना केला.
पाच वर्षांत पाच कोटी रोजगारांचे नुकसान झाले असून अद्याप 24 लाख सरकारी पदे रिक्त आहेत आणि सरकार म्हणत सत्तेत आल्यावर आम्ही सगळे ठीक करू याकडे त्यांनी लक्ष वेधत मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
























































