शासकीय खरेदी केंद्र 12 महिने सुरु ठेवावे, अशोक डक यांची मागणी

20

सामना प्रतिनिधी । माजलगाव

शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने खरेदी करा असा निर्णय शासनाने केला असून जर हमीभावपेक्षा कमी दरात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केल्यास एक वर्ष कैद व रोख दंड व्यापाऱ्यांना केला आहे यामुळे माजलगाव मुख्य बाजार समिती आवार गेल्या 10 दिवसापासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे खरेदी केंद्र 12 महिने सुरु ठेवावे अशी मागणी सभापती अशोक डक यांनी  केली आहे.

शासनाने लागू केलेल्या नियामामुळे आणि मोजक्याच वेळेत शासन खरेदी केंद्र सुरू राहत असल्याने संपूर्ण शेतकऱ्यांचा शेतमाल शासकीय हमीभावात खरेदी होत नाही तसेच ऐन सणासुदीचे दिवस असताना गेल्या 10 दिवसापासून व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी सभापती अशोक डक यांनी केली आहे. शेतकर्‍यांचे हाल थांबवण्यासाठी सभापती अशोक डक आणि संचालक भोसले यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेला बाजार तत्काळ सुरु करावा यासाठी नवीन बाजार याठिकाणी सर्व व्यापारी वर्गास एकत्रित घेत बैठक घेतली. या बैठकीत शासकीय खरेदी केंद्र 12 महिने सुरु ठेवावे अशी मागणी करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या