ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा.अविनाश डोळस यांचे निधन

57

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा.अविनाश डोळस यांचे संभाजीनगर येथे रविवारी सकाळी 5.30 वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे आणि साहित्य प्रकाशित करणाऱ्या राज्य सरकारच्या समितीचे सदस्य सचिव होते. तसेच भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते होते.

डोळस यांच्या अकाली निधनाने एक लोकप्रिय विचारवंत आंबेडकरी समाजाने गमावला असून चळवळीचे अतोनात नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

summary- prof avinash dolas passed away

आपली प्रतिक्रिया द्या