
गरजू विद्यार्थी आणि आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापक विजयालक्ष्मी महाले यांचे अल्पशा आजारामुळे बुधवारी निधन झाले. त्या महापालिका आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
विजयालक्ष्मी महाले या अंमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. संगीत आणि सामाजिक कार्यात त्यांना विशेष रस होता. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवार, 23 एप्रिल रोजी सांताक्रुझ पश्चिम, जुहूतारा रोडवरील सुरेश वाडकर म्युझिकल अॅकॅडमीतील आजिवासन सभागृहात सायंकाळी 5 ते 7 यादरम्यान शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.



























































