शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत, 35 हजार कोटींची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेला आज मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. कारण उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीच्या प्रस्तावाचा अहवाल सादर होणार असल्याचे समजते. कर्जमाफीसाठी 30 ते 35 हजार कोटी रुपयांची गरज आहे. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता नक्की किती शेतकऱ्यांना याचा फायदा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जामखेडमध्ये रविवारी भाषण करताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दहा दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेची घोषणा केली जाईल असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर कर्जमाफीच्या प्रस्तावाचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच कर्जमुक्ती देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने तयार केलेला हा अहवाल तयार झाला आहे.