
रोगप्रतिकारशक्ती घडविण्याच्या कामी प्रथिनांच्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय)ने डॅनॉन इंडियासोबत सहयोगाने चौथ्या प्रोटीन वीकचे उद्घाटन केले. हा सप्ताह 24 ते 30 जुलै या कालावधीत पार पडणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिथे आहारातील प्रथिनांची कमतरता ही अतिशय चिंताजनक बाब आहे अशा मुंबईसह देशाच्या काही प्रमुख शहरांमध्ये सार्वजनिक आरोग्याविषयी जनजागृती घडवून आणणारे कार्यक्रम डिजिटल माध्यमाद्वारे आयोजित केले जाणार आहेत. 2017 मध्ये केलेल्या एका पाहणीच्या निष्कर्षांनुसार शहरातील 70 टक्के लोकसंख्येमध्ये प्रथिनांची कमतरता होती.
यावर्षी देशातील अग्रगण्य आहारतज्ज्ञ मुंबई व इतर शहरांमधील कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचा-यांशी संवाद साधणार असून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याच्या कामी प्रथिनं आणि इतर महत्त्वाच्या पोषक तत्वांकडून बजावल्या जाणा-या भूमिकेबद्दल त्यांना जागरुक करणार आहेत. या जनजागृती कार्यक्रमाव्यतिरिक्त डॅनॉन इंडियाने फिटरफ्लायच्या पोषण तज्ज्ञांच्या सहकार्याने अभिनव असे इम्युनो-न्यूट्रियन्ट कॅल्क्युलेटरही प्रसिद्ध केले आहे. या कॅल्क्युलेटरमुळे ग्राहकांना आपल्या रोजच्या आहारात रोगप्रतिकारशक्तीला पाठबळ पुरविण्यासाठी उपयुक्त असलेली पोषक तत्वे किती प्रमाणात असतात याचे मूल्यमापन करण्यास मदत होते व त्यामुळे त्यांना अशा पोषक तत्वांचे सेवन वाढविण्यासाठी आवश्यक ती पावले उचलता येतात. हे इम्युनो-न्यूट्रियन्ट कॅल्क्युलेटर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना सीआयआय नॅशनल कमिटी ऑन अलाइड सेक्टर्स इन अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष अरबिंद दास म्हणाले, ”आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा या मुद्दयासाठी डॅनॉन इंडियाशी भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे. लोकांना जागरूक करत आणि त्यांच्या पौष्टिक गरजा उत्तमप्रकारे समजण्यामध्ये त्यांना सक्षम करत पोषक तत्त्वे आणि आहाराच्या सवयी याबद्दलच्या त्यांच्या विचारसरणीमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. हिंदुस्थानला आरोग्यदायी बनवण्यासाठी जीवनाच्या सर्व स्तरांमधील लोकांचे आरोग्य आणि स्वास्थ्य यांची सुरक्षितता जपण्याप्रती सीआयआय कटिबद्ध आहे आणि हा उपक्रम म्हणजे त्या दिशने उचललेले एक पुढचे पाऊल आहे.”
या उपक्रमाबद्दल बोलताना डॅनॉन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर हिमांशू बक्षी म्हणाले, ”डॅनॉनमध्ये आम्ही स्थानिक पातळीवर लोकांच्या पोषणाच्या गरजांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत. डॅनॉन इंडिया 2017 पासून प्रोटीन वीकचे आयोजन करत आहे. यावर्षी, सीआयआयशी केलेली भागीदारी आणि या आठवड्यासाठी आखलेल्या अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमा यांनी आमचा उत्साह वाढविला आहे.”
प्रोटीन वीक उपक्रम हा आरोग्य व स्वास्थ्य टिकविण्याच्या कमी प्रथिनांचे असलेले महत्त्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. मोसमी आजार आणि आरोग्याच्या इतर अनेक समस्यांपासून संरक्षण पुरविणारी खंबीर रोगप्रतिकारशक्ती घडविण्यामध्ये प्रथिनं महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीराची संरक्षण यंत्रणा, अँटिबॉडीज, एन्झाइम्स आणि हार्मोन्स यांची चौकट तयार करण्याचे काम प्रथिनं करतात. प्रथिनांबरोबरच अ, क, ड, ई, ब6, ब12 यांसारखी जीवनसत्वे, झिंग, फॉलिक अॅसिड, लोह आणि तांबे हे घटकही रोगप्रतिकारशक्ती घडविण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहेत.
देशात प्रथिनांची कमतरता ही आजही एक मोठी आरोग्यसमस्या आहे. आयएमआरबीने 2017 मध्ये केलेल्या पाहणीनुसार दर दहा देशवासियांपैकी सात जणांमध्ये प्रथिनांची कमतरता असते आणि 93 टक्के लोकांना आपल्या दैनंदिन आहारात प्रथिनांचे प्रमाण किती हवे याची माहितीच नसते. आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून आणि आपल्या उत्पादनांमध्ये सतत नव्या संकल्पनांचा समावेश करत आहाराच्या माध्यमातून उत्तम आरोग्य देण्याचे आणि देशातील प्रथिनांची कमतरता भरून काढण्याचे डॅनॉन इंडियाचे लक्ष्य आहे.































































