वीज दरवाढीविरोधात 8 ऑगस्टला आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरण कंपनीने लागू केलेल्या इंधन समायोजन आकारामुळे राज्यभरातील वीज ग्राहकांवर पुढील पाच महिने सुमारे सात हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे. सदरची दरवाढ मागे घ्यावी म्हणून महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीने 8 ऑगस्ट रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालये, महावितरणच्या कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी स्पष्ट केले आहे.