‘एसएनडीटी’ विरोधात विद्यार्थिनींचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

तोकडे कपडे घालणाऱ्या विद्यार्थिनीला जाब विचारून कपडे उतरवण्यास भाग पाडणाऱ्या एसएनडीटी विद्यापीठाच्या वॉर्डन रचना झवेरी आणि कुलगुरू शशिकला वंजारी यांच्या विरोधात मंगळवारी विद्यार्थी भारती संघटनेने चर्चगेट कॅम्पसच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. ‘आमच्या कपड्यांवर आमचा अधिकार, ‘पुराणकालीन कुलगुरू वंजारी चले जाव’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे एकीकडे ‘मी-टू’ मोहिमेच्या माध्यमातून स्त्रीयांवरील अत्याचाराला वाचा फोडली जात असताना खास मुलींसाठी सुरू झालेल्या एसएनडीटी विद्यापीठातच विद्यार्थिनींवर असे अन्याय होत असल्यामुळे आंदोलन केल्याचे विद्यार्थी भारतीच्या राज्य अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी सांगितले. या प्रकरणाबाबत शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.