बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात आज निषेध आंदोलन

रॅपिडो आणि उबेरसारख्या पंपन्यांच्या बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवेविरोधात राज्यातील पॅब चालक आणि रिक्षा चालक पुन्हा आक्रमक झाले आहेत. निष्क्रिय शासनव्यवस्थेचा निषेध करण्यासाठी पॅब चालक, रिक्षा चालक आणि नागरिक सोमवारी दुपारी 12 वाजता आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत. शनिवारी मुलुंड येथे रॅपिडोच्या बेकायदा बाईक टॅक्सीवर प्रवास करणाऱया महिला प्रवाशाचा मृत्यू झाला, तर गेल्या महिन्यात घाटकोपर येथे उबेरच्या बेकायदा बाईक टॅक्सी चालवणारा अरविंद कोलगेचा मृत्यू झाला तर प्रवासी गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे बेकायदा बाईक टॅक्सी सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परवानगी नसतानाही रॅपिडो कंपनी पांढऱ्या नंबर प्लेटवरील दुचाकाRचा व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी बेकायदेशीर वापर करत आहे. अशा वाहनांवर प्रवास करणाऱया प्रवासी व चालक दोघांनाही इन्शुरन्सचा कोणताही लाभ मिळत नाही, असे भारतीय गिग कामगार मंचचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी सांगितले.