धनगर आरक्षण: सुमित्रा महाजन यांच्या कार्यक्रमात दगडफेक, पोलीस जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जामखेड

राज्यात भाजप सरकार येऊन साडे तीन वर्ष झाली तरी धनगर आरक्षणाच्या दिशेनं कोणतंही पाऊल उचलले जात नाही. यामुळे संतप्त लोकांनी आज सरकारचा निषेध करत लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला.

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी धनगर समाजाच्या लोकांनी सरकारवरील आपला राग व्यक्त करत गोंधळ घातला. याच दरम्यान, दगडफेक झाल्याचं वृत्त असून एक पोलीस जखमी झाल्याचं वृत्त आहे. यानंतर धनगर आरक्षणाच्या मागणीसंबंधी स्टेजसमोर घोषणा देणारे बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.