
इंडोनेशियामध्ये लोकप्रतिनिधींना दिल्या जाणाऱ्या भरमसाट भत्त्याविरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप उफाळून आला आहे. खासदारांना मिळणाऱ्या 50 लाख रुपिया म्हणजेच 3075 डॉलर मासिक भत्त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन पुकारले आहे. देशातील विविध भागात पुकारलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी स्थानिक विधिमंडळ भवनाला आग लावल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच 25 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.
इंडोनेशियाची राजधानी माकास्सरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशात हे आंदोलन तीव्र झाले आहे. मेदान, सोलो, योग्यकार्ता, मागेलांग, मालंग, बेंगकुलू, पेकनबारू आणि पापुआ या शहरात पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार चकमक उडाली. जकार्तामध्ये आंदोलन करणाऱ्या 951 लोकांना अटक करण्यात आली आहे. देशातील दुसरे सर्वात मोठे शहर सुराबायामध्ये आंदोलकांनी पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. मुख्यालयात असलेले तार पुंपण तोडले, तेथे पार्ंकगमध्ये असलेल्या वाहनांना आग लावली. नेत्यांना इतके भरमसाट भत्ते कशाला हवेत, असा लोकांचा सवाल आहे. लोकप्रतिनिधींविरोधात पुकारलेले हे आंदोलन देशभर पसरले आहे.
राष्ट्रपतींचा चीन दौरा रद्द
इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबिआंतो हे रविवारी चीनमध्ये होणाऱ्या एससीओ शिखर बैठकीला जाणार होते. परंतु, या आंदोलनामुळे त्यांना चीनचा दौरा शेवटच्या क्षणी रद्द करावा लागला.