28 विदेशी उपग्रहांसह PSLV C-45 चे यशस्वी उड्डाण, 5000 जणांनी घेतला थरारक अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pslv-c-45 EMISAT

सामना ऑनलाईन । श्रीहरिकोट्टा

हिंदुस्थानच्या अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आज पीएसएलव्ही C-45 द्वारे EMISAT उपग्रहाचे श्रीहरिकोट्टा येथून उड्डाण करण्यात आले. तब्बल 28 विदेशी उपग्रहांसोबत सोमवारी सकाळी 9:27 वाजता हे यशस्वी उड्डाण झाले. पीएसएलव्ही- C-45 च्या उड्डाणाचे वैशिष्ट्य म्हणजे इस्रोच्या इतिहासात पहिल्यांदाच सामान्य नागरिकांना थेट पाहाता यावा यासाठी विशेष सोय करण्यात आली होती. 5000 हजार लोकांनी हे यशस्वी उड्डाण ‘याची देही याची डोळा’ पाहिले.

PSLV C-45 मिशनची वैशिष्ट्ये

– इस्रोचे हे पहिले मिशन आहे की ज्यामध्ये तीन वेगवेगळ्या कक्षेत उपग्रह सोडण्यात आले.

– या मिशनमध्ये EMISAT म्हणजेच इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सॅटेलाईट लाँच करण्यात आले. हा कृत्रिम उपग्रह डीआरडीओला संरक्षण संशोधनात मदत करण्यात महत्वाची भूमिका निभावणार आहे.

– यासोबतच अन्य देशांचे 28 कृत्रिम उपग्रह देखील PSLV C-45 ने लाँच केले. ज्यामध्ये अमेरिकेचे सर्वाधिक 24, लिथुआनियाचा 1, स्पेनचा 1 आणि स्वित्झरलँडचा 1 कृत्रिम उपग्रह आहे.