
सेक्युलर मुव्हमेंट व सेक्युलर आर्ट मुव्हमेंटच्या वतीने बुधवारी मुंबईत जाती जनगणना, आरक्षण उपवर्गीकरण आणि धर्मांतर बंदी कायदा या विषयांवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार व चळवळीच्या परिप्रेक्ष्यातून भूमिका मांडण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. गौतमीपुत्र कांबळे असतील. या विषयांवर संघटनेचे कार्याध्यक्ष व सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके, महासचिव प्रा. डॉ. भरत नाईक, पत्रकार रक्षित सोनावणे, मधु कांबळे, युवराज सोनावणे आणि दृश्य कलावंत प्रभाकर कांबळे मांडणी करतील असे संघटनेचे मुंबई अध्यक्ष विनोद शिंदे व महासचिव प्रा. आनंद बिडकर यांनी सांगितले.


























































