
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
जम्मूहून श्रीनगरकडे जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना रत्नागिरीकरांनी श्रध्दांजली वाहिली.
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहाच्या आवारात शुक्रवारी सायंकाळी मोठ्या संख्येने रत्नागिरीकरांनी उपस्थितीत लावून आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेना उपनेते आणि म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, राहुल पंडीत, वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल विभूते, नमिता कीर, समीर इंदुलकर यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























































