पुलवामातील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, स्थानिकांनी जवानांवर केली दगडफेक

824

जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याचे समजते. चकमकीनंतर स्थानिकांनी जवानांवर तुफान दगडफेक केली. दरम्यान हंदवाडा भागातही जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे समजते

पुलवामा जिल्ह्यातील डुंगेरपुरा येथे काही दहशतवादी लपले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर या भागात शोध कारवाई सुरू करण्यात आली. या शोधकारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर स्थानिक लोकांनी दहशतवाद्यांना निर्दोष असल्याचा दावा करत जवानांवर दगडफेक केली.

आपली प्रतिक्रिया द्या