पुणे – हत्याराच्या धाकाने भंगार व्यावसायिकाला मागितली खंडणी, दोघा सराईतांना अटक

हत्याराचा धाक दाखवून भंगार व्यावसायिकाला खंडणी मागणाऱ्या दोघा सराईतांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हडपसरमधील रामटेकडी इंडस्ट्रीज परिसरात घडली.

जालिंदरसिंग अजितसिंग कल्याणी (वय 52) आणि शुभम सातपुते अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. याप्रकरणी सतीश नाना गायकवाड (वय 36) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सतीश यांचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. काल संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सराईत जालिंदरसिंग आणि शुभम सतीश यांच्या भंगाराच्या दुकानात गेले. त्यांनी हत्याराचा धाक दाखवून तेथील कामगारांमध्ये दहशत माजविली. भंगाराचा व्यवसाय सुरू ठेवायचा असल्यास दरररोज 6 हजारांची मागणी केली. त्यानंतर सतीश यांना हत्याराचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील 12 हजार 300 रूपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी वानवडी पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या