
आंबेगाव येथील कचरा प्रकल्पाला आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग राजकीय पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या कार्यकत्र्यांनी लावली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
आंबेगाव परिसरात महापालिकेने काही महिन्यांपूर्वीच कचरा प्रकल्प सुरू केला आहे. जवळपास 4 कोटी रुपये या प्रकल्पासाठी पालिकेने खर्च केले आहेत. मात्र हा प्रकल्प सुरू करण्यापासूनच त्याला स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांचा विरोध होता.
आज दुपारी अचानक कचरा प्रकल्पाला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानुसार अग्निशमकचे दोन फायबर बंब आणि पाण्याच्या टँकरासह जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. याबाबत पोलिसांना विचारले असता, कचरा प्रकल्पाला आग कशी लागली हे लगेच सांगता येणार नाही. त्याची माहिती घेतली जात असल्याचे सांगितले.
































































