दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याला अटक, खडक पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टिंबरमार्केट परिसरातील दुकांनामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याला ख़डक पोलिसांनी अटक केली आहे. दरोडेखोरांकडून दोन कोयते, मिरचीपूड आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. निखील विश्वास थोरात (वय 23, रा. लोहियानगर), द्वारकाधिश बाबासाहेब पवार (23), सुरेश रमेश भिसे (वय 20 दोघेही रा. गंजपेठ) , यश उर्फ आदित्य सुभाष लोंढे (रा. लोहियानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अमलदार सुनील वालकोळी यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी शिवमंदीर आणि अंबाबाई देवीच्या मंदीरालगत काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन कोयते, मिरचीपूड, नायलॉन दोरी असे दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य सापडले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहूल खंडाळे अधिक तपास करीत आहेत.