कोरोनामुळे सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

पुणे शहर पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस दलात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या बळींची संख्या सहावर गेला आहे. भगवान रामचंद्र निकम (वय 55) असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

भगवान निकम हे पोलीस दलातील विशेष शाखेत नेमणुकीस होते. ते कुटुंबासह विश्रांतवाडी पोलीस वसाहतीत राहत होते. त्यांना डायबेटीस व मणक्याच्या त्रास होता. 12 सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते होते. त्यानंतर पुन्हा कमांड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना त्यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसापासून त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

आपली प्रतिक्रिया द्या