पुणे – दुचाकी आडवी घालत 40 हजारांची पिशवी पळविली

बँकेत हप्ता भरण्यासाठी 40 हजारांची रोकड घेउन जाणाऱ्या तरुणाला दुचाकी आडवी घालत चोरट्यांनी भरदिवसा रोकडची पिशवी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास कोथरुडमधील जितेंद्र अभिषेकी गार्डनसमोर घडली. याप्रकरणी प्रसाद आढाव (वय 35, रा. वारजे माळवाडी) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद सीसीटीव्ही बसविण्याचे काम करतात. बुधवारी दुपारी त्यांनी एका बँकेतून 40 हजारांची रोकड काढली होती. रोकड दुसऱ्या बँकेत घेउन जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना दुचाकी आडवी मारली. त्यामुळे प्रसाद यांनी दुचाकीचा वेग कमी केला. नेमकी संधी साधून चोरट्यांनी त्यांची त्याच्याकडीत 40 हजारांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेली. याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु असून, लवकरच आरोपींना अटक केली जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक धीरज गुप्ता यांनी सांगितले.

दुचाकीस्वार चोरट्यांनी चहावाल्याला लुटले

चहाटपरी बंद करुन घरी निघालेल्या तरुणाला तिघा दुचाकीस्वार चोरट्यांनी अडवून मोबाईल, रोकड मिळून 16 हजारांचा ऐवज चोेरुन नेला. ही घटना दोन दिवसांपुर्वी मध्यरात्री एकच्या सुमारास विमानतळ परिसरातील फॉरेस्ट पार्क रस्त्यावर घडली. याप्रकरणी सागर पाटील (वय 23, रा. लोहगाव ) यांनी फिर्याद दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या