पुण्यात डहाणूकर कॉलनीतील बंगल्यात रखवालदाराचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कोथरूडमधील डहाणूकर कॉलनी परिसरात अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यात एका रखवालदाराचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या खूनाचे कारण समजू शकले नाही

दिलीप उर्फ रवींद्र रावण तावरे (वय 47, सध्या रा. डहाणूकर कॉलनी, पुष्पलता बिल्डींगजवळ, कोथरूड) असे खून झालेल्या रखवालदाराचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तावरे कुटूंबिय कोथरूडमधील अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यात राहायला आहेत. दिलीप उर्फ रवींद्र मद्यपी असल्याने त्याची पत्नीसोबत भांडणे होत होती. काही दिवसांपासून ते  बंगल्यात रखवालदार म्हणून काम करत होते.

शुक्रवारी (25 डिसेंबर) दिलीप  बंगल्याच्या आवारात बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्यांच्या मुलाने पाहिले. त्यानंतर  त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,  उपचारांपूर्वीच दिलीप  मरण पावला होता. त्यानंतर  पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठवून दिला. शवविच्छेदन अहवालात दिलीपचा गळा दाबल्याचे आणि  मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अलंकार पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजीवन जगदाळे यांनी दिली. तावरेच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही.