पुणे – कॅम्पमध्ये कर्नलचा मोबाईल हिसकाविला

शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून मोबाईल चोरट्यांची मजल आता लष्करी अधिकाऱ्यांचे मोबाईल हिसकाविण्यापर्यंत गेली आहे. दोन दिवसांपुर्वी कॅम्प परिसरात रात्री जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका कर्नलचा 21 हजार रुपये किंमतीचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसका मारून नेला. याबाबत पराग दुवा (वय -47, रा. क्वार्टर स्टेशन, कमांड हाऊस, कॅम्प) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुवा हे लष्करात कर्नल असून दोन दिवसांपूर्वी रात्री पावणे नऊच्या सुमारास ते कॅम्पमधील जनरल बेऊर रस्त्यावरून फिरत होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी दुवा यांच्या हातातील 21 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मनमीत राउत यांनी दिली आहे

आपली प्रतिक्रिया द्या