
भरधाव वेगातील मोटार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात जेष्ठ नागरिक ठार झाले आहेत. तर पती-पत्नी जखमी झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील कॅन्टोमेंट बोर्ड टोलनाक्यासमोर घडली.
पांडुरंग जयराम कुलकर्णी (वय 72) असे ठार झालेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई दीपक भोेईर यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी रात्री दहाच्या सुमारास कुलकर्णी कुटूंबिय कॅन्टोमेंट परिसरातून जात होते. त्यावेळी पांडुरंग यांचा मुलगा मोटार चालवित होता. त्याचे नियंत्रण सुटल्यामुळे मोटार दुभाजकाला जाउन धडकली. त्यामुळे पांडुरंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अहिवळे तपास करीत आहेत.























































