पुणे – शतपावली करणाऱ्या जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकाविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घराशेजारी शतपावली करणाऱ्या एका जेष्ठ महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेले. ही घटना काल संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास एरंडवण्यातील भरत कुंज सोसायटीसमोर घडली. याप्रकरणी महिलेने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला शतपावली करीत होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील 70 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला, मात्र, तोपर्यंत चोरटा पसार झाला. याप्रकरणी पोलसी उपनिरीक्षक सूरज गोरे अधिक तपास करीत आहेत