
पुणे शहरातील महमंदवाडी परिसरासह मुंढव्यातील घोरपडीत झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार झाले. याप्रकरणी वानवडी आणि मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरधाव वाहनचालकाने दिलेल्या धडकेत तरूण ठार झाला. हा अपघात 24 जुलैला सकाळी पावणेआठच्या सुमारास महमंदवाडीतील हेवन पार्क रस्त्यानजीक घडला. मोहनलाल उर्फ राजू भोला पंडीत (वय 37 रा. झारखंड) असे ठार झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. एच. लांभाते तपास करीत आहेत.
तीनचाकी टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात 22 जुलैला रात्री साडेदहाच्या सुमारास घोरपडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ घडला होता. श्रीकांत उर्फ सौरभ सुहास गायकवाड (रा. कॅम्प) असे ठार झालेल्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. आर. काटे तपास करीत आहेत.























































