
कोकणात वाहून जाणारे पाणी अडवून गोदावरी खोऱ्यात टाकून येणाऱ्या काळात मराठवाडा दुष्काळमुक्त करणार, ही तुमची शेवटची पाणी टंचाई असेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते महाजनादेश यात्रेच्या कडा आणि आष्टी येथील सभेत बोलत होते, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मंत्री राम शिंदे, आ.सुरेश धस, खा.प्रीतम मुंडे, आ.सुजितसिंह ठाकूर, आ.भीमराव धोंडे, खा.सुजय विखे, माजी आ.साहेबराव दरेकर हे उपस्थित होते.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजयानंतर आता भाजप सरकार विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. यात सरकारने गेल्या पाच वर्षात केलेली विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री .याच य़ात्रेसाठी कडा आणि आष्टी येथे आले होते. यावेळी महाजनादेश यात्रा पाथर्डीमार्गे धामणगाव, कडा येथे मुख्यमंत्री पोहचताच आ.सुरेश धस यांनी कडा येथे स्वागत सभेचे आयोजन करून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी धस समर्थकांनी मोठी गर्दी होती.
कडा येथील सभेनंतर आष्टी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.भीमराव धोंडेनी शक्ती प्रदर्शन केले. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुढच्या वर्षीच्या आतापर्यंत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये कृष्णा मराठवाड्याचा पाणी आणण्याच्या प्रयत्न आमचा आहे. आमचा विश्वास आहे की, आपल्या आशिर्वादाने आम्ही तो यशस्वी करू. बीड जिल्ह्यातील जनतेला ढगाकडे लक्ष लाऊन बसावे लागते आणि अनेक वेळा निसर्ग आमच्यावर कोपतो, आमची अवस्था वाईट होते. त्यास आम्ही कायमची मुक्ती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एवढेच नाही तर आता निसर्गावर अवलंबून रहायचे नाही तर निसर्गाची सेवा तर करायची त्यासोबत जे कोकणामध्ये पडणारे पाणी जे समुद्रात वाहून जात आहे. ते समुद्रात वाहून जाणारे पाणी उचलून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार आहोत. ही केवळ घोषणा नसून पंकजाताईसह सर्व मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे त्याचा जनआराखड्यात समावेश केला आणि मंजूर केला. त्यास कॅबिनेटची मान्यता दिली. पुढच्या काळात पाणी पाच वर्षात कोकणामध्ये जाणारे पाणी मराठवाड्यात आणून दुष्काळमुक्त करणार आहोत. 20 कोटीची वॉटर ग्रीड योजना या देशातील सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे. ती मराठवाड्यात करण्याचा निर्णय केला आहे. त्याचे टेंडर देखील काढले आहे. 20 हजार कोटी रूपये खर्च करून प्रत्येक गावात पाणी पोहचले पाहिजे या करीता पाईप पध्दतीने मराठवाड्यातील 11 धरणे एकमेकांशी जोडून मराठवाडा दुष्काळमुक्त करणार आहोत असे सांगितले. आष्टी येथील सभेनंतर जामखेड येथे महाजनादेश यात्रा रवाना झाली. नगर-बीड राज्यमार्गावर अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.
































































