किरकोळ कारणावरून पट्ट्याने मारहाण करून पसार झालेले दोघे जण जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किरकोळ कारणावरून एकाला लोखंडी रॉड, कंबरेच्या पट्ट्याने गंभीररित्या मारहाण करून पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. रास्ता पेठ भागात मामाला भेटण्यासाठी आले असता दोघांना ताब्यात घेण्यात आले.

तेजस अजित वाडेकर (22, रा. कोथरूड), सचिन अजित रसाळे (39, रा. मंगळवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत किर्तीकुमार जाजू यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना रविवारी (4) मंगळवार पेठेतील सोमेश्वर मंदिराच्या आवारात घडली होती.

किर्तीकुमार जाजू यांचे मंगळवार पेठ आवारात गोदाम आहे. रविवारी कामगार त्यांच्या गोदामातील माल उतरवत होते. यावेळी काही कामगार येथे असलेल्या मंदिर परिसरात थुंकले. याबाबत मंदिरातील पुजाऱ्याने या परिसरात थुंकले. याबाबत मंदिराच्या पुजाऱ्याने किर्तीकुमार यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीमुळे त्यांनी कामगारांनी केलेल्या त्यांच्या या चुकीमुळे त्यांची समजूत काढली.

यावेळी पुजाऱ्यांचा मुलगा सचिन आणि नातू तेजस यांनी वाद घातला. वादाचे रुपातंर हाणामारीमध्ये झाले. सचिन आणि तेजस यांनी कंबरेचा पट्टा काढून मारहाण केली. यामुळे दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास युनिट एककडून सुरू होता. मारहाणीनंतर सचिन आणि तेजस दोघेही पळून गेले. यादरम्यान गुन्ह्यातील दोघे संशयित रास्ता पेठेत येणार असल्याची माहिती युनिट एकचे अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी गुन्हयाची कबूली दिली. युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार महेश बामगुडे, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर यांन ही कामगिरी केली.