
आरडा-ओरड आणि शिवीगाळ करू नका असे सांगितल्याचा राग आल्यामुळे तरूणाला बॅटने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना लष्कर पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना काल संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास कॅम्पमधील सलधाना स्ट्रीटवर घडली.
शफू उर्फ सरफराज खान आणि जब्बार इलियास शेख (वय 34, दोघेही रा. कॅम्प ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी इरफान शेख (वय 38, रा. कॅम्प) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास इरफान त्यांचा भाउ आणि दोन मित्र गप्पा मारत बसले होते. त्यावेळी शफू आणि जब्बार आरडा-ओरड करीत त्याठिकाणी आले. त्यामुळे इरफान यांनी दोघांना आरडा-ओरड न करण्याचे सांगितले. त्याचा राग आल्यामुळे जब्बार याने इरफानला तेरे को जादा मस्ती चढी है, अभी जान से मार डालता हू असे म्हणत त्यांच्या डोक्यात बॅटने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याशिवाय परिसरातील लोकांमध्ये आणि लहान मुलांमध्ये दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. डी. सोनवणे तपास करीत आहेत.




























































